वायफळ गोष्टी (भाग १)
एका फणसाची गोष्ट
नुकतीच थंडी संपून उन्हाळा सुरु झालेला असतो. वाडीतल्या फणसाच्या झाडाला एक कुयरी लागते. आणि दिसामाशी वाढू लागली. हा फणस अगदीच बोल घेवढा होता. दिवस रात्र बडबड करीत असे. पण मनाने अगदीच साधा भोळा, डोक्यावर विरळ केस, तोंडातले दात फेंदारून बाहेर आलेले. आणि जिभेचा पट्टा सुरु. त्या झाडाबाजूलाच एक आंब्याचं झाड होता. शांन्त. घरंदाज, मोजकं बोलणार.
एक दिवस दिनू बाळाने तो फणस काढून एक पायरी ठेवला पण जरा आडोश्याला, पटकन दिसणार नाही असा आणि त्याच्या बाजूला आंबा ठेवला. झाल, सुरु झाली फणसाची बडबड. आंब्याचं तर डोकं उठल,. याची गोष्ट आपली सुरु. "बर का!! तुला म्हणून सांगतो, सांगू नको कुठे बर का !!!" या फणसाला सारखी सारखी "बर्र का " " बरं का" म्हणायची सवय. त्याच्या वायफळ बडबडीने आंबा चांगलाच गरम झाला,
लाल बुंद झाला, आणि एवढा पकाला, एवढा पकाला की पिकून गेला, आंब्याला आला राग कारण तो असा prematurely पि(प)कला होता ना...!!फणसाच्या बडबडीने
तो भडकून म्हणाला "ए हे बघ, तुझ्या फालतू बडीबडीने आधीच खूप पकलोय, मी तुला शाप देतो कि हा माणूस तुला कापून खाईल आणि सारखं सारखं काय रे "बरं का, बरं का!!" जा ...... तुझं नाव आज पासून 'बरका'"
आणि अशाप्रकारे त्या दिवसापासून काही फणस गप्प झाले आणि कापले गेले (म्हणून कापा) आणि काही बरके राहिले.
तळ टीप: अतिशय भिक्कार अशी कंमेंट करू नये