भांडूप उदंचन केंद्र
या नावातून काहीहीही अर्थबोध लागत नाही, पण हे नाव पक्षी प्रेमीच्या ओळखीच आहे (काहीस). या भागातले काही पक्षी आणि त्यांची नावं यांचा धांडोळा घ्यायचा हा छोटा प्रयत्न (किती अदबशीर असाव माणसाने).
एक गमतीदार बाब म्हणजे इथे पोहोचण्यासाठी भांडुपला न उतरता नाहूरला उताराव लागतं आणि तेथून Google map वर "इथे कोपऱ्यावर तर आहे" असा दिसणार हे ठिकाण बऱ्यापैकी लांब आहे. त्यामुळे ज्यांना सकाळी लवकर उठून पक्षी बघण्या साठी पायी जायची इच्छा (खाज) असेल, त्यासाठी हे अंतर निश्चितच मेजवानी आहे. highway वर आपल्या कडे निरनिराळ्या नजरेने बघणारे मिळतात, (जणूकाही पायी चालणारा माणूस पाहिल्यांदा पाहावा), वाटेत एक बस stand आहे, तिथली वैतागलेली माणस "हा वेडा एकटा चालत का आणि कुठे जातोय" अशा नजरन बघत असतात. एक मात्र नक्की की चालताना एकांत मिळतो, मजा येते. पक्षांचे थवे पण त्याच दिशेला उडताना दिसतात, खात्री पटते कि चाल्लोय ती दिशा बरोबर आहे. highway ओलांडून आत शिरल्या वर रस्त्याच्या एका बाजूस मिठाघर आणि दुसर्या बाजूस, उदंचन केंद्राची जमीन. दोन्ही भूभाग सखल, दलदलीचा, पाणथळ आणि काही प्रमाणात तीवर आणि झाडाझुडपाने आच्छादलेला. आतल्या बाजूस अर्धा एक किलोमीटर चालल्यावर, एक कौलारू घर आणि त्या समोरील एक काळा कुत्रा आपला स्वागत करतो. हा कुत्रा माझ्या दर भेटीला भुंकून भुंकून हैराण होतो बिचारा. तिथून लगेच डाव्या बाजूला वळून पुढे गेल्यावर सुरु होतं हे क्षेत्र. तिथला रस्ता (एकमेव) मुख्यत्वे दोन कारणांमुळे अजून बर्यापैकी शाबूत अहे. १. तिथे रहदारी फार कमी आणि २. तो रस्ता महानगर पालिका सांभाळीत नाही.

एका बाजूला म्युन्सिपाल्टी गटाराच पाणी ढवळते आणि दुसऱ्या बाजूला निसर्ग त्या चिखलमधे आपलं कार्य अविश्रांत करत असतो. (हे वाक्य बऱ्याच लोकांच्या मनातल्या "निसर्ग" च्या भावनेला तडा देणारं आहे नै). हो पण तिथे होणाऱ्या या चिखलमुळे तिथे एक पूर्ण ecosystem develop झालीये. आणि त्यातूनच "हिरवा निसर्ग हा भवतीने" वैगेरे निर्माण झाला आहे. आज वरच्या प्रत्येक भेटीत वेगवेगळे पक्षी (आणि तोच कुत्रा) दिसले.
आजपर्यंत बऱ्याच वेळेला गेलोय, पण माझा पहिला अनुभव सही होता (किंबहुना ते सही असतात म्हणूनच पहिले असतात). माझ्या मित्रांनी त्यांच्या "मित्र" पणाला स्मरून आयत्यावेळेला टांग दिली आणि माझी पहिली भेट घडली. Whatsapp ठरल्यानुसार मी भल्या पहाटे ६ वाजता नाहुरला (आमच्यापैकी काहींसाठी ६ म्हंजे साखरझोपेची वेळ) एकटाच अजागळासारखा हजर!! म्हटलं थोडं पुढे होऊया येतील मागाहून, असं म्हणत म्हणत मी, अर्ध्याहून अधिक पोहचलो होतो. पण नक्की वाट माहित नसल्यामुळे, बराचवेळ मिठाघरांशीच रेंगाळलो होतो. तिथे उगाच फालतू फोटो काढ, उडणारा कावळा बघ वैगेरे प्रकार चालू असताना एक गाडीवाला आला आणि तोही बिचारा मी जिकडे बघेन तिकडे बघत होता. त्याने शक्य तितक्या नम्र स्वरात विचारलं "हेच का ते ठिकाण?" मी पण माझ्या सात पिढ्या पक्षी बघण्यात गेल्या अशा अविर्भावात शक्य तेवढ्या उडत्या शब्दात आणि स्वरात "होय हो… इथेच इथेचे" ठोकून दिलं. आणि आमच्या दोघांच्या सुदैवानं bird फोटोग्राफरची गाडी बाजूने गेली, मी लगेच म्हटलं ते पण तिथेच जातैत बहुतेक. त्या माणसान मला lift दिली, आणि मी पण थोडेसे आळोखे-पिळोखे घेतले आणि त्याच्या गाडीत बसलो. त्याच्या बायकोच flight ४ तास लेट होतं, म्हणून तो timepass करायला आला होता अशी माहिती प्रवासात कळली. मनात म्हटलं, बायको आली की हा काही BIRDS बघू शकणार नाही !! तिथे पोचल्यावर एक गोष्ट लगेच ध्यानात येते की अनेक माणसं घोळक्याने फिरतायत. साधारपणे ३-४ माणस प्रत्येकी आणि प्रत्येक घोळक्यात एक ज्ञानी पुरुष, सर्वात महाग लेन्स कॅमेरा असणारा एक इसम आणि ज्याच्याकडे सर्वात भिक्कार दुर्बीण असते असा एक, अस सर्वसाधारण पृत्थ्करण असत.
पहिल्यावेळी मला अनेक पक्षी ओळखता नाही आले. पण पहिल्या भेटीतच रोहित पक्ष्यान सोन केल्याने माझी पहिली भेट सफळ झाली, मी खुशीत होतो. तिथून निघाताना मला एकाने कल्याण पर्यंत लिफ्ट दिली. पण लागलेला वेळ पाहता अस वाटलं की नाहूर ला सोडलं असत तर लवकर पोहचलो असतो.
मागाहून मला कोणी तरी सांगितलं की त्या भागात हातभट्ट्या आहेत, तेव्हा कॅमेरा असेल तर जपून जा. त्यामुळे उगाचच मला धाडसी सफर करून आलो अस वाटून गेल.
असो, खाली लिहिलेली यादी अपूर्ण आहे, दरवेळी नवीन पक्षी add होतो.
Spot billed Ducks हळदी कुंकू
Painted stork चित्रबलाक
यादी मोठी होईलच, तुम्हाला काही वेगळे दिसले असतील तर तुम्हीही कळवा.
बघू !!!
दरवेळी वेगळ दिसतं
ता. क.
माझ्या शुल्लक वेळच्या अनुभवावरून लोकांना माझी एक विनंती आहे
१. त्याचं कै आहे! साधारणपणे आपण दुसऱ्याच्या घरात गेल्यावर वाह्यातपणे, मोठमोठ्याने बोलत नाही. हेच किमान पथ्य इथे बाळगाव.
२. अतिउत्साह टाळावा, जमीन दलदलीची आहे
३. कचरा करू नका
४. पक्ष्याच्या उडणारा फोटो हवाय म्हणून त्याला उडवून लावू नका

English name मराठी नावे
Cormorants पाणकावळा
Pond heron ढोकरी /वंचक
Kites घारी
Kingfishers खंड्या आणि बंड्या
Black wing Stilts शेकाट्या
Robin दयाळ
Munia मुनिया
Baya सुगरीण
Shrike खाटिक
Green Bee eater वेडा राघू
Spotted dove कवडा
Drongo भृंगराज
Sunbirds सूर्यपक्षी
Smaller and Greater Egrets बगळे
Bulbul बुलबुल (दोन्ही प्रकारचे)
Parakeet पोपट
Sandpiper तुतवार
आज वर मला एकदाच दिसलेले पक्षी
Copper smith barbet तांबट
Greater coucal भारद्वाज (कोकणात कोकम कावळा म्हणतात)
Eurasian yellow oriole हळद्या
Brahmney kite ब्राह्मणी घार
प्रवासी पक्षी
Flamingo रोहित
Painted stork चित्रबलाक
यादी मोठी होईलच, तुम्हाला काही वेगळे दिसले असतील तर तुम्हीही कळवा.
बघू !!!
दरवेळी वेगळ दिसतं
ता. क.
माझ्या शुल्लक वेळच्या अनुभवावरून लोकांना माझी एक विनंती आहे
१. त्याचं कै आहे! साधारणपणे आपण दुसऱ्याच्या घरात गेल्यावर वाह्यातपणे, मोठमोठ्याने बोलत नाही. हेच किमान पथ्य इथे बाळगाव.
२. अतिउत्साह टाळावा, जमीन दलदलीची आहे
३. कचरा करू नका
४. पक्ष्याच्या उडणारा फोटो हवाय म्हणून त्याला उडवून लावू नका
Rosy starling and Ashy Prinia
ReplyDelete